इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या भारतीय संस्कृतीत मुलांनी आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांची म्हातारपणाची काठी व्हावी, अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे बहुतांश मुले आपल्या मातापित्यांना सांभाळ करतात. परंतु काही मुले ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. इतकेच नव्हे तर त्यांचा छळ देखील याचा कळस म्हणजे काही गुंड प्रवृत्तीची मुले त्यांना मारहाण करतात. इतकेच नव्हे तर त्यांना त्यांचा जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत अशीच घटना पंजाब मध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे.
लुधियाना येथे वृद्ध पती-पत्नीच्या मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कसून तपास सुरू केला असता एका दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या दाम्पत्याच्या मुलाला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. कारण त्यापुर्वी भूपिंदर सिंग (६५) आणि त्यांची पत्नी शुष्पिंदर कौर (६२) यांचे मृतदेह गुरु तेग बहादूर नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून सापडले.
पोलीस आयुक्त कौस्तुभ शर्मा यांनी सांगितले की, या जोडप्याचा मुलगा हरमीत सिंग हा त्याला मिळणाऱ्या 18,500 रुपयांच्या मासिक खर्चावर खूश नव्हता आणि त्यामुळेच त्याने दोघांची हत्या करण्याची योजना आखली. हरमीतने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील हरमीतचा साथीदार बलविंदर उर्फ राजू याला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य दोन साथीदार विकास गिल आणि सुनील मसिह फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, भूपिंदर सिंग भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर शाळा चालवत होता आणि 50 स्क्वेअर यार्डमध्ये घरे बांधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विकत असे. त्याने सांगितले की, हरमीत याने बलविंदर, विकास आणि सुनील या तीन बेरोजगार तरुणांशी बोलून त्यांना अडीच लाख रुपयांसाठी आई-वडिलांची हत्या करण्यास पटवले.