इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक अमानुष प्रकार समोर आला आहे. नरवाल येथे बेपत्ता झालेल्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अवघे ९ वर्षे वयाचा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. संतापजनक म्हणजे, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार देत गोंधळ घातला. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर शहराजवळ एका गावात, राज मिस्त्री यांच्या कुटुंबात पत्नी व दहा मुले आहेत. नऊ वर्षांचा मुलगा हा पाचव्या क्रमांकाचा होता. सायंकाळी तो घराबाहेर खेळत असताना तो अचानक बेपत्ता झाला. पोलीस चौकी येथे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोटो नसल्याने पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद केली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांनी या मुलाचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना फोन केला. मृतदेहाच्या बाजूला मारेकऱ्यांची दारूची बाटली, दोन ग्लास आणि सिगारेटचा बॉक्स सापडला.
नरवल येथील या मुलाच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस प्रत्येक मुद्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच गैरकृत्यांबरोबरच तंत्र-मंत्राची काही शक्यता आहे. घटनास्थळी दिसणारे भयावह दृश्य पाहून पोलीस सर्व प्रकारच्या शक्यतांवर विचार करत आहेत. मुलाचा फोटो घेऊन वडील पाली पोस्टवर पोहोचले. मुलाचा डोळा खिळ्याने काढण्यात आला. तसेच चेहराही सिगारेटने जाळण्यात आला होता. मुलाचे वडील घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह पाहून खूप दुःखी झाले. निष्पापाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. डोळ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. तसेच गालावर खुणा होत्या. हा सर्व प्रकार पाहून आई-वडील कुकर्माची भीती व्यक्त करत होते. याबाबतही पोलीस तपास करत आहेत.