इंदूर (मध्य प्रदेश) – पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटचा मास्टरमाईंड मुनीर उर्फ मुनीरुल आहे. त्याने आतापर्यंत २०० हून अधिक तरूण मुलींचा बनावट विवाह लावून त्यांना थेट कॉल गर्ल केले आहे. यातील बहुतेक मुली बांगलादेशी असून या मुलींना भारतात आणून वेगवेगळ्या शहरांना पाठवले जात होते.
इंदूर पोलिसांनी सूरत येथून दलाल मुनीरला अटक केली होती. तो मूळचा बांगलादेश मधील जसोर येथील रहिवासी आहे. त्याला चौकशीसाठी इंदूरला आणले जात असताना चौकशी दरम्यानच त्याने अनेक गोष्टी कबूल केल्या आहेत.
मुनीरने पोलिसांना सांगितले की, त्याने आतापर्यंत ७५ मुलींशी लग्न करण्याचा बनाव केला. तो बांगलादेशातील गरीब घरातील मुलींशी लग्न करायचा. तसेच काही भामट्यांशी संगनमत करून त्यांच्याशी सुमारे १०० मुलींचे बनावट विवाह रचले होते. यानंतर पोरस सीमेवरील नाल्यातून तो भारताच्या हद्दीत प्रवेश करायचा आणि एजंट्सच्या माध्यमातून आसपासच्या गावांतून भारतात प्रवेश करायचा. यानंतर त्या मुलींची वेगवेगळ्या शहरांमध्ये तस्करी करण्यात आली.
बांगलादेशातून आल्यानंतर मुलींना काही कोलकात्यात ठेवण्यात आले. येथे त्यांना वाईट कामाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यानंतर काही काळ मुंबईत आणण्यात आले. ग्राहकांच्या मागणीनुसार महिलांचा पुरवठा करण्यात येत असे. सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी पोलीस बऱ्याच काळापासून कारवाई करत आहेत. गेल्या ११ महिन्यात पोलिसांनी २१ बांगलादेशी मुलींची सुटका केली आहे. ५ भामटे पोलिसांच्या कारवाईत पकडले गेले आहे. मात्र मुनीर फरार झाला होता, त्यावर १० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या चौकशीत आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची चिन्हे आहेत.