शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! स्कूल बसवर नंग्या तलवारींनी हल्ला; भर रस्त्यात रंगला असा थरार

ऑगस्ट 18, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा किंवा स्कूल मधून वाहतूक करणे, ही एक मोठी जबाबदारी असते. कारण लहान मुलांना बसमध्ये चढविणे उतरविणे, तसेच सुरक्षित स्थळी म्हणजे त्यांच्या घरी किंवा स्कूलपर्यंत सोडणे हा महत्त्वाचा टप्पा पार करताना वाहन चालकांना मोठी काळजी घ्यावी लागते. परंतु काही वेळा असे प्रसंग उद्भवतात की वाहनचालक घाबरून जाऊ शकतो. मात्र प्रसंगावधान राखत त्यातून काही वांचालक मार्ग काढतात. पंजाब मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका स्कूलबसवर नंग्या तलवारींद्वारे हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र अशा गंभीर प्रसंगी देखील जखमी झालेल्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. याची सध्या चर्चा होत असून त्या वाहन चालकाचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंजाबच्या बरनालामध्ये स्कूल बसवर धारधार शस्त्रधारी बाइकस्वारांनी हल्ला चढवला. यात बस ड्रायव्हर जखमी झाला. धारधार शस्त्र आणि तलवारींनी हल्लेखोरांनी बसच्या काचा फोडल्या. पंजाबच्या बरनालामध्ये स्कूल बसवर धारधार शस्त्रधारी बाइकस्वारांनी हल्ला चढवला. यात बस ड्रायव्हर जखमी झाला. धारधार शस्त्र आणि तलवारींनी हल्लेखोरांनी बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि आरडाओरडा सुरू झाला.

विशेष म्हणजे जखमी झालेल्या ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवत हल्लेखोऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी बस थेट नजिकच्या डीएसपी ठाण्यात नेली. यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचला आणि त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. एका हल्लेखोराची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे. बरनाला मधील एअर फोर्सच्या केंद्रीय विद्या मंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसवर काही हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. बसमध्ये जवळपास ३० ते ३५ विद्यार्थी होते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचं काम बस ड्रायव्हर करत होता.

इतक्यात अचानक चार मोटरसायकलस्वारांनी बसवर चक्क तलवारी आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला केला. या घटनेत बसच्या काचा फुटल्या. तर ड्रायव्हर लखविंदर सिंग तलवारीच्या हल्ल्यात जखमी झाला. तरी प्रसंगावधान बाळगत ड्रायव्हरनं बसचा वेग वाढवत ती थेट पोलीस ठाण्यात नेली आणि हल्लेखोरांपासून सुटका केली. बसवरील हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काहींनी सांगितलं की बसवर ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा खूप दहशतीचं वातावरण होतं. शहरात दिवसाढवळ्या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासन आणि सरकारनं अशा पद्धतीचे हल्ले रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे. एका स्कूल बसवर अशापद्धतीचा जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. एका किरकोळ गोष्टीवरुन काही दिवसांपूर्वी ड्रायव्हर लखविंदर सिंग याचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. त्याच लोकांनी आज बसवर हल्ला केला. त्यांनी मला खाली उतरण्यास सांगितलं आणि बसवरच हल्ला केला, असा जबाब लखविंदरने पोलिसांना दिला आहे.

Crime School Bus Sword Attack on Road
Students Driver Punjab Barnala

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कर्मचारी पहिल्यांदाच उशीरा आला… कंपनीने घेतला हा निर्णय…. सर्व कर्मचाऱ्यांनीही शिकविला असा धडा….

Next Post

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ? शिंदे गट पुन्हा बाहेर पडणार ?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
संग्रहित फोटो

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ? शिंदे गट पुन्हा बाहेर पडणार ?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011