उरण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील प्रसिद्ध बंदर जेएनपीए (जेएनपीटी) मधून तब्बल तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. हे रक्त चंदन दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात येत होते. संशयित कंटेनरमधून जप्त केलेल्या या रक्तचंदनाची किंमत अडीच कोटी रुपये आहे. जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सी.आय.यू. ने ही कारवाई केली आहे. संशयामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर परत मागविला. दुबईतून परत मागविण्यात आलेल्या कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली.
निर्यात करण्यात आलेला सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन कंटेनरमध्ये आढळला आहे. दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील गोदामातून अशाच प्रकारे सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करीत असतांना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. विभाग आणि कसून तपास करीत आहे. त्याआधारे आणखीही रक्तचंदन मिळण्याची चिन्हे आहेत.
Crime Red Sandalwood Seized in JNPT