पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात दहा लाख रुपये किमतीचे “सेक्स टॉईज” जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल शहरातील एका गोडाऊनमधून जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्स टॉईज विक्रीत दिल्ली नंतर बंगळुरु आणि मुंबईचा नंबर आहे. तर पुण्यात सेक्सटॉईज ऑर्डर करण्यात पुरुष मंडळी ६५ टक्क्यांच्याही पुढे आहेत. हे प्रमाण लॉकडाऊन दरम्यान वाढले आहे. या साहित्याची आयात मुख्यत्वे चीनमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे अशा ‘कॉस्मोपॉलिटन मेट्रो सिटी’तले नागरिक या वस्तुंची ऑनलाईन खरेदी करत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सध्या तरी नाही.
सध्या केंद्र सरकारने पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. मात्र ऑनलाईन सेक्स संबंधी माहिती सर्च करणाऱ्या मंडळीला मेसेज किंवा फोननंबर देऊन सेक्स टॉईज खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. भारतात सेक्स टॉईज विक्रीवर बंदी असली, तरी घरात सेक्स टॉईज ठेवण्यात बंदी किंवा कायदा नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुणालाही उत्तेजित करेल अशा प्रकारच्या संपूर्ण उघड्या वस्तुरूप बाहुल्या ठेवण्यास किंवा विक्री करण्यास बंदी आहे. पण अशा वस्तू घरात कुणी वापरत असेल किंवा ठेवत असेल तर त्या वापरण्यास बंदी नाही.
कोणाच्याही लैंगिक भावना उद्देपित करणारे, अश्लिलतेचं प्रदर्शन करणारे साहित्य मागवणे आणि विक्री करणे हे देखील बेकायदेशीर आहे. मात्र पुणे शहरात या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी तपास सुरू असून सेक्स टॉईज सापडलेल्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉय विकल्या जात होत्या काय ? याचा आता तपास पोलिस करत आहेत.
वेबसाईटवरून सेक्सटॉईजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांना मिळाली होती. त्यानंतर पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोडाऊनमध्ये अनेक सेक्स टॉय होते. याची किंमत सुमारे १० लाख रूपये होती. या प्रकरणी गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे, याची माहिती घेतली जात आहे. या साहित्यांचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचे सर्वेक्षण केले आहे. नागरिकांच्या लैंगिक गरजा, आवड यानुसार बाजारात विविध ‘सेक्स प्रॉडक्ट्स’ आणली जात आहेत. भारतातील कोरोना काळात सन २०२० मधील ‘सेक्स टॉईज’चा व्यवसाय हा साडेआठशे कोटींच्यापुढे असल्याचे सांगण्यात येते.
Crime Pune City Police Seized Sex Toys