सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील महिला तरुणी आणि अर्पण मुलीवर अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सायंकाळी किंवा रात्रीच नाही तर दिवसाढवळ्या देखील रस्त्याने फिरणे महिला वर्गासाठी धोकादायक ठरत आहे. त्याच सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढल्याच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षणासाठी अनेक मुली कॉलेजमध्ये बसने प्रवास करतात, कराड येथील काही मुली कॉलेज शिक्षणासाठी जिल्ह्याच्या गावी म्हणजेच सातारा येथे बसने प्रवास करतात, परंतु त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच आता सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केले. यापूर्वी देखील अनेक मुलींच्या बाबतीत काही जणांकडून असे प्रकार घडले आहेत, परंतु या कॉलेजच्या धीट मुलीने दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे काही मित्र मैत्रिणी ओळखीच्या पोलिसांनाच घेऊनच बसस्थानकांवर आले, तेव्हा तो छेड करणार पोलीस पळून जाण्याच्या बेतात मात्र त्यांनी त्या काढणाऱ्या पोलीसला शिताफीने ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे हा संशयित कर्मचारी हा कोल्हापूर पोलीस दलात असून तो खेळाडू देखील आहे. पण सातारा येथे अस होणाऱ्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो साताऱ्यात आला होता. या घटनेतील महाविद्यालयीन युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयित आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी महेश मगदूम यालाही बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
Crime Police Molestation Young Girl in Bus FIR