इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून शिक्षा करावी हेच त्यांचे कर्तव्य असते, सर्वसामान्य नागरिकांची देखील हीच अपेक्षा असते. परंतु काही पोलीस हे खोटेनाटे धंदे करतात आणि नागरिकांची फसवणूक करतात. त्यांच्याकडून पैसे देखील वसूल करतात. हप्ते गोळा करणे गोळा करणे, फसवणूक करणे, इतकेच नव्हे तर दुसऱ्या महिलेबरोबर संबंध ठेवणे, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामे देखील काही पोलीस करतात, असे अनेकदा समाजात आढळून येते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडतो. विशेषतः उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अलीकडच्या काळात अशा घटना वारंवार घडल्याचे आढळून आले आहे. सध्या देखील असेच एक प्रकरण समोर आले.
आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एका पोलिस हवालदाराने नागरिकांकडून हप्ते गोळा करणे सुरू केले, इतकेच नव्हे तर त्याचे दुसऱ्या एका महिलेसोबत देखील संबंध होते, आणखी गैरवर्तन म्हणजे त्याने त्या महिलेला एका हॉटेलमध्ये बोलून रोमान्स तथा संबंध ठेवणे सुरू केले, परंतु त्याच्या खऱ्या पत्नीला याचा याचा सुगावा लागला, त्यामुळे तिने तडक हॉटेल गाठले आणि पतीचा भांडाफोड केला.
इतकेच नव्हे तर पोलीस असलेल्या या पतीला चक्क मारहाण देखील केली. त्यामुळे उपस्थित असलेले एकाने चक्क व्हिडिओ शूटिंग केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याच्या पत्नीने आपल्या पतीने दुसरे लग्न केल्याचा आरोपही केला आहे. तसेच तिचा हवालदार पती बोगस उपनिरीक्षक होऊन गेल्या एक वर्षापासून पैसे गोळा करत असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नौबस्ता मचारिया येथील रहिवासी महिला विजयाराजे यादव ही पोलीस हवालदार राजीव यादवची पत्नी आहे. तिने तिचा नवरा राजीव यादवला एका फ्लॅटमध्ये एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना पकडले, त्यानंतर पती – पत्नी आणि ती महिला यांच्यात खूप वेळ भांडण सुरू होते. रागाच्या भरात विजयाराजे हिने पती राजीव यादव यांना मारहाण केली.
नवऱ्याचा विश्वासघातकीपणा चव्हाट्यावर आल्यावर पत्नीने आणखी एक खुलासा केला आहे. पत्नी विजयराजे यांनी सांगितले की, तिचा पती हवालदार असून त्याच्याकडे सब इन्स्पेक्टरचे बनावट ओळखपत्र मिळाले आहे. यामुळे गेल्या एक वर्षापासून तो नागरिकांकडून पैसे वसूल करत होता. असे करून लाखो रुपये कमावले आहेत. विजयराजेची नौबस्ता पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती.
अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पत्नी विजयराजे यांनी आता डीसीपी कार्यालयात जाऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त डीसीपी मनीष सोनकर यांनी सांगितले की, पिडीत पत्नीने कॉन्स्टेबल पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेपासून एक मूल आहे. याशिवाय पतीवर बनावट ओळखपत्र बनवून खंडणी उकळल्याचाही आरोप आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
Crime Police Constable beaten by wife raid hand Kanpur Uttar Pradesh