इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गोरखपूर जिल्ह्याच्या खोराबार हद्दीतील रायगंजमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची आणि तिच्या आई-वडिलांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसह चुलत भावाच्या लग्नाच्या मटकोडवा कार्यक्रमाला जाणार होती. दुसरीकडे हत्येनंतर आरोपी आलोक पासवान स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने स्वत:हून तीन खुनांची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ घटनास्थळी पोहोचले. गावात तणावाचे वातावरण पाहता खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत गामाचा पुतण्या केशव याने आलोकविरुद्ध नामनिर्देशित गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोराबारमधील रायगंज येथील मूळ रहिवासी असलेला गामा निषाद (45) हा परदेशात राहत होता. चार महिन्यांपूर्वी तो घरी आला. त्यानंतर त्याने गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगला चौकात घर बांधले. तेथे तो पत्नी व मुलांसह राहत होता.
गामाचा धाकटा भाऊ रामाच्या मुलीचे लग्न होणार होते. सोमवारी रात्री धार्मिक कार्यक्रम होता. गामा त्याची पत्नी संजू (38), मुलगी प्रीती (20) यांच्यासह नवीन घरातून पायी जात होते. वाटेत दबा धरून बसलेल्या आलोकने प्रितीला पाहून प्रेम व्यक्त केले.
प्रितीने नकार दिल्याने आलोकने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. हे वार इतके जोरदार होते की, तिचे डोके मध्येच फुटले. हे पाहून वडील गामा आणि आई संजू धावत आले, त्यानंतर माथेफिरूने त्यांच्यावरही हल्ला केला. तिघांचा जागीच मृत्यू झाला. निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडताना कोणीही पाहिले नाही. काही वेळाने आरोपीनेच पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गावप्रमुख सुग्रीव यांच्याशी संपर्क साधला आणि फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला.