नाशिक – सातपुरच्या मटन मार्केट परिसरात मंगळवारी (दि.२९) सकाळी युवकांच्या दोन गटाता तुफान हाणामार्या झाल्या असून यामध्ये लोखंडी रॉडसह तलवारींचा वापर करण्यात आला. यामध्ये एक गंभीर असून इतरही जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. भांडणे सोडवल्याची तसेच जुन्या भांडणाची कुरापत काढून मयुर खिराडकर, रोहन दाणी, प्रतिक घोडके, ओम बंदावणे व त्यांचे चार ते पाच मित्र (पुर्ण नाव, पत्ता नाही) यांनी तलवारीने मारहाण केल्याची तक्रार दर्शन मनोज डुगलज (२३, रा. मनपा चाळ, सातपुर मटन मार्केट) याने केली आहे. दर्शन या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय मोडला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी दर्शन हा मित्रासंमवेत मटन माकेट परिरात बसला असताना तेथे आलेल्या संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यावर तलवारीने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. तर मयुर अरूण खिराडकर याने दिलेल्या तक्रारीनुसार तो व त्याचा मित्र रोहण दाणी मटन माकेटपासून दाणी मळ्याकडे जात असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून दर्शन डुगलज, ज्ञानु वाघमारे, सागर वाघमारे यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक टी. एम. राठोड करत आहेत.