बुटात ठेवलेल्या चावीने घर उघडून चोरट्यांनी केला पाच लाखाचा ऐवज लंपास
नाशिक – माडसांगवीमध्ये घर बंद करुन बुटात ठेवलेल्या चावीने घर उघडून चोरट्यांनी ५ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही चोरी पाळत ठेऊन चोरट्यांनी केली असून संबधीत चोर हा माहितगार असल्याचे बोलले जात आहे. विष्णु लक्ष्मण मुंढे (वय ४२, रा. चारी नं ६, मांडसांगवी) यांच्या घरी ही घटना घडली आहे. मुंढे यांनी घराला कुलूप लावून चावी बुटामध्ये ठेवली होती. बुटात ठेवलेली ही चावी चोरट्यांच्या हाती लागली. त्यानंतर चोरट्यांनी या चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करुन ही चोरी केली. या चोरीत २,८०,००० रुपये रोख त्याबरोबरच ५१ हजारांचा १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचे नेकलेस, ६० हजारांची सोन्याची पोत, ७५ हजारांची अडीच तोळे वजनाची सोन्याची पटटीची पोत, ४५ हजारांचे १० ग्रॅम वजनाचे कानातले झुबे, ५ ग्रॅम वजनाचे वेल, साडेसात हजाराची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि रिंगा, तोरडया चिन्ह, सोन्याचे डोरले असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी भादंवि ३८०, ४५७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चोरीचा पुढील तपास सहायक निरीक्षक संतोष शिंदे हे करीत आहेत.
बस डेपो मधून तांब्याच्या धातूची वेल्डींग वायर चोरीला
नाशिक : एन.डी.पटेल रोडवरील एस.टी.महामंडळाच्या आगार क्रमांक १ मध्ये बस डेपो मधून चोरट्यांनी तांब्याच्या धातूची वेल्डींग वायर चोरट्यांनी लंपास केली आहे. या चोरीप्रकरणी स्वप्निल सुनिल उफाडे (रा.भाटीया स्टॉप,देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. उफाडे एसटी महामंडळाच्या एक नंबर आगारात कार्यरत असून गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी आगारातील सुमारे पाच हजार रूपये किमतीची वेल्डींग वायर चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सय्यद करीत आ