नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकात वृध्द प्रवासी महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आवारात सुभद्राबाई रामभाऊ आढाव (७५ रा.चिंचाळे ता.राहूरी,अ.नगर) या आल्या होत्या. त्या बसची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. चोरी गेलेल्या पिशवीत ३५ हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र होती. या चोरी प्रकरणी सुभद्राबाई आढाव यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.