नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्यात एक जणांविरूध्द बलात्कार तर तीन जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीसांनी मुख्यसंशयितास अटक केली आहे. निलेश नामदेव माळोदे (२७ रा.माडसांगवी ता.जि.नाशिक ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्यसंशयिताचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून एकाने तब्बल पाच वर्ष बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयितासह त्याच्या कुटूंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करून लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखविल्याने १ जानेवारी २०१७ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबध होते. यातून जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथील एका फ्लॅटमध्ये तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. चार – पाच वर्ष उलटल्याने युवतीने लग्नाचा तगादा लावला असता ही घटना घडली. संशयिताने लग्नास टाळाटाळ करीत नकार दिल्याने तिने त्याचे घर गाठले असता संशयिताची आई सुनिता माळोदे, उमेश माळोदे व शरद हांबरे आदींनी तिला जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त धुमाळ करीत आहेत.