नाशिक : उपनगर येथील ओमकार प्लाझा या इमारतीसमोरील रोडवर मायलेकींना शिवीगाळ करीत एकाने तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयितास पोलीसांनी अटक केली आहे. आकाश दिगंबर गोसावी (३५ रा.गोसावीनगर,उपनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताशी दोन वर्षापूर्वी तिचे प्रेमसंबध होते. मात्र कालांतराने त्याचा त्रास वाढल्याने तिने त्यास नकार दिला. गेल्या काही दिवसांपासून त्याने पुन्हा पाठलाग करून त्रास देत होता. सोमवारी सायंकाळी पीडिता आपल्या आई समवेत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. ओमकार प्लाझा या इमारतीसमोर पाठलाग करणा-या संशयिताने मायलेकींना गाठले. यावेळी त्याने दोघींना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. तसेच तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.