पार्क केलेल्या टेम्पो मधील कंपनीचे दीड लाख रुपयाचे लोखंडी स्पेअरपार्ट चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : स्वारबाबानगर भागात पार्क केलेल्या टेम्पो मधील कंपनीचे दीड लाख रुपयाचे लोखंडी स्पेअरपार्ट चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित अनिल आंबेकर (रा.गोरेवाडी ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आंबेकर यांनी सोमवारी अंबड औद्योगीक वसाहतीतील डी.जी.कार्पोरेशन आणि पीव्हीटी प्रा.लि. या कारखान्यांमधून टेम्पो एमएच १५ एजी ६३८९ मध्ये विविध प्रकारचे लोखंडी स्पेअर पार्ट भरले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी स्वारबाबानगर येथील मायको हॉस्पिटल भागात टेम्पो पार्क केला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी टेम्पो मधील सुमारे १ लाख ४७ हजार ५९५ रूपये किमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
….
घरफोडीत २८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी दागिणे, रोकडसह २८ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली राजेंद्रसिंग परदेशी (रा.सत्यभामा रो हाऊस,वजन काट्याजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. परदेशी कुटूंबिय गेल्या सोमवारी (दि.११) मुंबई येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून दहा हजाराच्या रोकडसह सोन्या चांदीचे दागिणे आणि घड्याळ असा सुमारे २८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
…..