नाशिक : पाथर्डी फाटा भागात टेरेसवर मद्यपानास मनाई केल्याने दोघांनी कुटूंबियांवर धारदार चाकूने हल्ला केल्याची घडली. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी अमोल दादा जाधव (रा.राम स्वरूप अपा.स्वराज्यनगर) व ब्रिजेश कुमार रामखिलावन (२७ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली जे.के.ट्रान्सपोर्ट शिवपार्क कॉलनी) यांना अटक केली आहे. या हल्ल्याची तक्रार साहिल नासीर सय्यद (२१ रा.रामस्वरूप अपा.स्वराज्यनगर,पाथर्डी फाटा) यांनी दिली असून इंदिरा नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद आणि जाधव एकाच इमारतीत वास्तव्यास असून सोसायटीच्या टेरेसवर मद्यपानास मनाई केल्याने हा वाद झाला. सय्यद यांची मावशी व मावस बहिण या मायलेकी रविवारी टेरेसवर झोपण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. दोघी मायलेकी टेरेसवर गेल्या असता दोघे संशयित तेथे सिगारेट ओढत मद्यपान करीत होते. यावेळी सय्यद यांचा मावस भाऊ आदित्य उर्फ बबलू विजय थापा याने दोघांना हटकले असता हा वाद झाला. संतप्त दुकलीने मायलेकींना शिवीगाळ केली. तसेच तळ मजल्यावर जावून आदित्य यास मारहाण केली. याप्रसंगी तक्रारदार सय्यद वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असतांना संशयीतांपैकी जाधव यांनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत पोटात चाकू खुपसण्यात आल्याने सय्यद जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.