नाशिक : सरस्वतीनगर भागात पोल्ट्री सर्व्हीसेसचे कार्यालय फोडून चोरट्यांनी रोकडसह महत्वाच्या कागदपत्रावर डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत २५ हजार रूपयांची रोकड भामट्यांनी लंपास केले आहे. याप्रकरणी सुरेश देवराम देवरे (रा.स्वामी समर्थ नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरे यांचे सरस्वतीनगर येथील देवी मंदिराजवळ देवरे पोल्ट्री सर्व्हीसेस नावाचे कार्यालय आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे ऑफिसचा कडीकोयंडा तोडून गल्यातील २५ हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.