नाशिक – अंबड औद्योगीक वसाहतीत वेगवेगळय़ा भागात दोन आत्महत्या
नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीतील वेगवेगळय़ा भागात दोन आत्महत्याच्या घटना रविवारी घडल्या आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील रूषीराज पंकज बिरारी (२२ रा.उपेंद्रनगर) या युवकाने रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून लोखंडी हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत अतुल बिरारी यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत. दुसरी घटना चुंचाळे गावात घडली.
तर दुसरी घटना अंबडलिंगरोड येथे घडली. येथे सिंधूताई उत्तम जाधव यांनी रविवारी आपल्या राहत्या घरातील पत्र्यांच्या अँगलला अज्ञात कारणातून ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. मावस भाऊ संतोष बेहाडे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
घरात पलंगावरून पडल्याने वृध्देचा मृत्यू
नाशिक : नाशिकरोड येथील शिखरेवाडी भागात राहत्या घरात पलंगावरून पडल्याने ८२ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आहिल्याबाई यशवंत पवार (रा.साईजन अपा.शिखरेवाडी) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. पवार या रविवारी (दि.१०) आपल्या घरातील पलंगावर झोपलेल्या असतांना अचानक जमिनीवर पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या कमरेस मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.