नाशिक – पंचवटी परिसरात समाजात बदनामी करण्याची धमकी देत एकाने पाठलाग करून नोकरदार विवाहीतेचा विनयभंग केल्याची घटना घडली. मंगेश वंजारी (रा.नवनाथनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागात वास्तव्यास असून दोघांची तोंडओळख आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती राजीवगांधी भवन परिरातील एका सराफी शोरूममध्ये नोकरीस आहे. गेल्या चार महिन्यांपासून संशयित तिचा पाठलाग करीत असून शनिवारी त्याने रस्ता अडवून हे कृत्य केले. ९ जानेवारी ते ९ एप्रिल दरम्यान संशयित पीडितेचा पाठलाग करून तू माझ्याशी का बोलत नाही अशी विचारणा करीत होता. शनिवारी त्याने माझ्याशी बोलली नाहीस तर तुझी समाजात बदनामी करेन तसेच व्यवस्थीत जगू देणार नाही अशी धमकी दिल्याने विवाहीतेने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डी.एस.पाटील करीत आहेत.