नाशिक – भावाशी व्यवहार असल्याचे सांगून दोघांनी महिलेला एक लाख २२ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मखमलाबाद रोडला क्रांतीनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी वैशाली अशोक शर्मा (वय २५, वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, क्रांतीनगर) या युवतीच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी पावणे पाचच्या सुमारास तक्रारदार युवती तिच्या निरंजन ट्रेडर्स या दुकानात असतांना पांढऱ्या वॅगनार गाडीतून आलेल्या दोघांनी दुकानात जाऊन महिलेला तिच्या भावासोब व्यवहार असल्याची बतावणी करुन तिच्याकडून १ लाख २२ हजार रुपयाला गंडा घातला.








