सोशल माध्यमावर बालकांचे अश्लिल व्हिडीओ
नाशिकः इंस्टाग्राम या सोशल माध्यमाद्वारे प्रोफाईलधारकांनी बालकांचे अश्लिल व्हिडीओ इतरांना प्रसारीत केल्या प्रकरणी विविध दोन जणांनावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सायबर सेलकडून सीडी प्राप्त झाली असून यामध्ये नाशिक येथील दोघा इंस्टाग्राम प्रोफाईल धारकांनी बालकांचे अश्लिल व्हिडीओ इतरांना प्रसारीत केले. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा २०० चे कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक परोपकारी करत आहेत.
…..
मुलीचे अपहरण
नाशिकः पेठरोड परिसरातून एका मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने दाखल केली आहे.
रविवारी (दि.६) सायंकाळी हा प्रकार घडला. सायंकाळी घराबाहेर पडलेल्या मुलीस फुस लावून अज्ञाताने तीचे अपहरण केल्याचे तक्रारी म्हटले आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…..
दुचाकी लंपास
नाशिकः शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून निमाणी बस स्टॅण्ड परिसरातून पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार २९ मे रोजी घडली. याप्रकरणी कैलास रामनाथ रिकामे (रा. विंचुरगवळी, ता. नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी ५ मे रोजी त्यांनी निमाणी येथील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यासमोर दुचाकी सायकल पार्क केली होती. त्यांनी आता ती शोधण्याचा प्रयत्न केला असता आढळून आली नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.