नाशिक : रेडक्रॉस भागात बांधकाम साईटवर काम करीत असतांना तोल जावून पडल्याने ३० वर्षीय मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संध्या अनंता कांबळे (३० मुळ रा. हिंगोली, रेडक्रॉस) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेहरू गार्डन परिसरातील महाराष्ट्र बँकेमागे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामावर गुरूवारी मृत महिला काम करीत असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने ती दुस-या मजल्यावरून पडली होती. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक बोंबले करीत आहेत.