येवला – येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पित्यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय दंड संविधान ३७६ तसेच पोक्सो अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. बापाच्या त्रासाला कंटाळून मुलीने येवला शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बापाला अटक करण्यात आली. दरम्यान नराधम बापा या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश मेढे, पोलीस हवालदार राकेश होलगडे, पोलीस शिपाई गणेश सांगळे आदी करित आहे.