तीन लाखाची घरफोडी
नाशिकः बंद घराच्या किचनीची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.६) मखमलाबाद रोड परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी शंकुतला भोये ( रा. रा. सुरगाणा, सध्या मखमलाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. भोये कुंटुंंबिय बाहेरगावी गेले असताना शनिवार ते रविवारच्या दरम्यान त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातील ठेवलेले ३ लाख रूपयांची रोकड व ४ हजार रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक माळी करीत आहेत.
…..