नाशिक – दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; शहरातील वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला
नाशिक : शहरातील वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा, भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना खुटवडनगर येथे घडली आहे. येथील सुहास भिकाजी भामरे (रा.वावरे प्लाझा,गोदावरी मार्ट समोर) यांची स्प्लेंडर एमएच १९ एजे २८२४ मंगळवारी (दि.५) रात्री त्यांच्या सोसायटी्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. दुस-या घटनेत मदिना चौकात राहणारे हाजी निसारउद्दीन अलाउद्दीन शेख यांची मोटारसायकल एमएच १५ सीसी ७२९२ गेल्या शनिवारी रात्री जहांगिर मज्जीद येथील कर्बस्थान भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिस-या घटनेत पेठरोडवरील भास्कर श्रावण चव्हाण (रा.श्वेता गॅस गोडावून जवळ,मेहरधाम) हे गेल्या २६ मार्च रोजी आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गेले होते. पार्किगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ बीएम ३१८६ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक :४८ वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मधुबन कॉलनी भागात घडली आहे. या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण पुढे आले नसले तरी दुर्धर आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. राजू हरिभाऊ गायकवाड (रा.द्रोणागिरी रो हाऊस,मधुबन कॉलनी) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. गायकवाड यांनी बुधवारी सायंकाळी आपल्या घरी कुणी नसतांना अज्ञात कारणातून बेडरूममधील पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात असून याबाबत मुलगा अनिकेत गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार माळोदे करीत आहेत.