नाशिक : शहराती वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या दोन घटना घडल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनेत अपहरण करण्यात आल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला आहे. नाशिकरोड भागात घडली. डी.एस.कन्या तथा कोठारी शाळेत गेलेली अल्पवयीन मुलगी सोमवार पासून बेपत्ता आहे. तिचे कुणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मुन्तोडे तपास करीत आहेत.तर दुसरी घटना मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. येथे राहणा-या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुणे येथे सामान घेवून जाण्यासाठी सदर महिला सोमवारी दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ भागात टेम्पो शोधण्यासाठी गेली होती. यावेळी तिची अल्पवयीन मुलगी घरात होती. मात्र महिला परतल्यानंतर ती दिसून आली नाही. कुणी तरी तिचे अपहरण केल्याचा संशय वर्तविण्यात येत असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके तपास करीत आहेत.