डोंगरावरू पडून युवक ठार
नाशिकः फिरण्यासाठी एकलहरे परिसरातील डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. तुषार संजय दोबाडे (१६, रा. मोरेमळा, बालाजीनगर, जेलरोड) असे या अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार हा एकलहरे परिसरातील डोंगरावर फिरण्यासाठी गेला असताना ५ ते ६ फुट उंचावरून तोल गेल्याने तो खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तुषार यास त्याच्या भावाने तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चिखले करत आहेत.
….
दुचाकी लंपास
नाशिकः शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून मुंबई – आग्रा महामार्गावरच्या बाजुला एका हॉटेलच्या पर्किंमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरटट्यांनी लंपास केल्याचा प्रकार १९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी भरत भाऊसाहेब थेटे (रा. दुर्गामाता मंदिर, पाथर्डी शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी एप्रिल मध्ये हॉटेल स्कायलार्क येथे दुचाकी पार्क केली होती. त्यांनी आता ती शोधण्याचा प्रयत्न केला असता आढळून आली नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.