नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सिडकोतील तानाजी चौक भागात घडली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. महेश अवधूत रूईकर (रा.तानाजीचौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रूईकर कुटूंबिय ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान धुळे येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातून १५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७८ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.