नाशिक – डंपर वाहनावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना आडगाव शिवारात जत्रा हॉटेल समोर घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव नेमबहादूर शुकलाल केशी (वय ४०, जत्रा हॉटेल समोर आडगाव) आहे. याप्रकरणी लिलावती मोहन खत्री यांच्या तक्रारी वरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, केशी हे त्यांच्या दुचाकी वरुन जात असतांना २८ मार्चला आडगाव मेडीकल चौफुली जवळ आडगाव कडून जत्रा हॉटेल कडेजात असतांना डी मार्ट इन गेट समोर डंपरवर आदळले. या अपघातात त्यांच्या पायाच्या घोट्याजवळ मार लागला होता. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांचे निधन झाले.