नाशिक – जून्या वादातून चौघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना वडाळा मार्गावरील कॅप्टन पेट्रोलपंपाजवळ घडली. शुक्रवारी रात्री नऊला ही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अशरफ रजा अंजुम मकरानी (वय २४, सिल्हर डेल,अपार्टमेंट मदिना चौक सारडा सर्कल) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रमीज, जाहीद, राजू आणि अन्सार अशी संशयितांची नावे आहेत.