नाशिक – मेडिक्लेम मंजूर करून घेण्यासाठी हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र बनवून त्याचा उपयोग केल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणेनगर येथील सुमन हॉस्पिटलचे डॉ. भरत शिवदास कांबळे यांनी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार केले होते. त्याचा वापर इन्शुरन्स कंपनीकडून मेडिक्लेम मंजूर करून घेण्याकरिता त्यांनाी केला. त्यामुळे त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या फसवणूक प्रकरणी डॉ. बापूसाहेब भागवत नागरगोजे (४२, रा. प्लॉट नंबर २०, शिवांजली लेन नं.४, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत.