मटका खेळणारे १७ जण जेरबंद
नाशिकः भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १७ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भद्रकाली लिकर देशी दारूच्या दुकानाच्या जवळ तलावडी या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये विजय किसन गावंडे ( ५२ रा. राणाप्रताप चौक, नवीन नाशिक ) यांच्यासोबत सोळा जण मटका खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी याठिकाणी टाकून २२ हजार ५६० रुपये रोख रक्कम व वीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन तसेच ८१० रुपये किमतीचे मटका जुगाराशी संबंधित साहित्य असा ४३ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि मुगले करीत आहेत.
…
दुभाजकास धडकून दुचाकीस्वार ठार
नाशिकः भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.५) सकाळी पाथर्डीगाव परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी बाळू बेरड ( ३३, रा. शिंगवे बहुला, देवळाली गाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव हे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी बेरड हे त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना पाथर्डी गाव या ठिकाणी असलेल्या सर्कलच्या दुभाजकावर त्यांची मोटारसाकयल धडकल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना औषध उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज याठिकाणी दाखल करण्यात आले.दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.