सातपूर येथे जन्माला आलेल्या नकोशीला कुणीतरी फेकुन दिल्याची घटना
नाशिक : सातपूर येथे जन्माला आलेल्या नकोशीला कुणीतरी फेकुन दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात कुमातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नकोशी कचराकुंडीत मृत अवस्थेत निगळगल्ली रोडवरील भंदुरे वाडा भागात मिळाली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अज्ञात मातेने नुकत्याच जन्मास आलेल्या स्त्री जातीच्या मृत अर्भकास उघड्यावर टाकून दिले. अचानक कावळयांसह कुत्र्यांनी गोंगाट केल्याने स्थानिकांनी धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला. सदर अर्भकाच्या जन्माची लपवणुक करण्याच्या उद्देशाने कुमातेने त्यास इग्लिश शाळेच्या भिंती जवळच्या निळया रंगाच्या डस्टबिनमध्ये फेकल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलीस नाईक कांतीलाल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मातेविरूध्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
दुचाकी चोरीला
नाशिकरोड – इमारतीच्या पार्किंगमधून २० हजार रुपये किंमतीच्या सीबीझेड एक्स्ट्रीम दुचाकीची (एमएच १५ डीडी ५११४) अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिखरेवाडी भागातील पार्कव्हीव अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. संदीप दौलत त्रिभुवन (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.