नाशिक – पुणे – नाशिक प्रवासा दरम्यान शिवशाही बस मधून चोरट्यांनी लॅपटॉप केला लंपास
नाशिक – पुणे – नाशिक प्रवासा दरम्यान शिवशाही बस मधून लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरी प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गजानन महाजन (वय ४०, श्वेता अर्पाटमेंट कोषिकोनगर ) हे बुधवारी रात्री साडे आठला नाशिकला येण्यासाठी शिवशाही बसमधून पुण्याहून बसले असताना रात्रीच्या प्रवासात केव्हातरी चोरट्यांनी त्यांचा लॅपटॉप चोरला. मध्यरात्री एकला नाशिकला उतरल्यानंतर लॅपटॉप चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना सिडकोत उत्तमनगरला घडली आहे. सत्यवान अर्जुन पाटील (वय ४९, शुभम पार्क, उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी (दि.३१) मृत सत्यवान पाटील यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीच्या पत्र्याच्या लोखंडी ॲगला ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दखल झाला आहे.