दिंडोरी रोडवरील लामखेडे मळ्यात घरफोडी; चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिनेसह ५३ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक – दिंडोरी रोड वरील लामखेडे मळ्यात चोरट्यांनी घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने सह ५३ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.चोरट्यांनी बुधवारी रात्री घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे चार ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १५ ग्रॅमचे कानातील टॉप्स, मुरणी, चांदीचे जोडवे, लक्ष्मीचे नाणे, पूजा साहित्य असा सुमारे ५३ हजाराचा ऐवज चोरुन नेला. या घरफोडी प्रकरणी ललित अरुण महाजन (वय ३२, लामखेडे मळा दिंडोरी रोड) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
….
सोसायटीतील पार्किंग मधून दुचाकी चोरीला
नाशिक – सोसायटीतील पार्किंग मधून चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेल्याची घटना पंचवटीत मखमलाबाद रोड वरील अष्टविनायक नगर परिसरातील वास्तुरंग इन्क्लेव्ह घडली आहे. नवनाथ शंकर तांबे (वय ३०, वास्तुरंग इन्क्लेव्ह ) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (दि.३०) त्यांनी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांची युनिकॉन दुचाकी (एमएच १५एफ एक्स ७५८३) पार्किंग केली असता चोरट्यांनी रात्रीतून दुचाकी चोरुन नेली