नाशिक – फोनवर काही तरी सांगत असल्याच्या संशयातून दोघांनी मुलीसह तिच्या वडिलांना केली मारहाण
नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फोनवर बोलत असलेली मुलगी आपल्याबद्दल कोणाला तरी काही सांगत असल्याच्या संशयातून दोघांनी मुलीसह तिचे वडिलांना मारहाण केल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर, आगर टाकळी येथे मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडली. दिलीप कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरुण बारकू आव्हाड आणि दत्तू उर्फ विनोद राजू वाकळे रा. समतानगर यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची मुलगी मनीषा ही फोनवर बोलत असतांना संशयितांनी मनीषा ही आमच्याबद्दल कोणाला काही सांगत आहे का अशी विचारणा केली. मनीषाने नकार दिल्याने दोघा संशयितांना राग आला. त्यांनी मुलीला आणी तिचे वडील दिलीप कांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दिलीप कांबळे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारल्याने कांबळे जखमी झाले. पोलीस हवालदार शेजवळ या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
नाशिक – महिलेच्या गळ्यातील साठ हजाराची पोत चोरट्यांनी लांबविली
नाशिक – गणेश वाडी आठवडे बाजारात सामान खरेदी दरम्यान महिलेच्या गळ्यातील साठ हजाराची पोत चोरट्यांनी लांबविली. शिलाबाई शिवाजी सुर्यवंशी (वय ६५, तुलशी छाया बिल्डींग, आडगाव) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिलाबाई सुर्यवंशी या बुधवारच्या बाजारातखरेदीला गेल्या असता, ही घटना घडली. गणेशवाडी भागात खरेदी करत असतांना चोरट्यानी बाजारातील गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या गळ्यातील सुमारे साडे तीन तोळ्याचे मंगळसूत्र व पोत चोरुन नेली. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोल्ट्री फॉर्म शेजारील गोठ्यातून दोन बैल चोरीला
नाशिक – भगूरला विजयनगर परिसरातून करंजकर पोल्ट्री फॉर्म शेजारीतल गोठ्यातून चोरट्यांनी दोन बैल चोरुन नेले. पंकज रामदास कदम (वय ४८, रेस्ट कॅम्प रोड दे. कॅम्प) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी करंजकर पोल्ट्री फार्म शेजारील गोठ्यातून बैल जोडी चोरुन नेली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.