नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी तेरा वर्षाची असून संशयिताकडून ती शाळेतून घरी पायी जात असतांना तिचा पाठलाग करण्यात आला. तिला फोन करायला संशयिताने दबाव टाकला. फोन न केल्यास वडिलांना मारण्याची धमकीही अल्पवयीन संशयिताने मुलीला दिली. मुलीचे वडिल या प्रकरणी संशयितास जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही संशयिताने मारहाण केली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे तीन वाजेच्या दरम्यान पीडित मुलीच्या शाळेसमोर, बिटको चौक आणि शिवाजी पुतळा चौक या रस्त्यावर घडली.