नाशिक : महामार्गावरील आडगाव शिवारात भरधाव दुचाकी स्पिडब्रेकरवर आदळल्याने त्यात चालकाचा मृत्यु झाला. नेमबहाद्दूर शुकलाल केशी (४० रा.स्टेट बँकेजवळ,जत्रा हॉटेल) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केशी सोमवारी सकाळच्या सुमारास आडगाव कडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी स्पिडब्रेकरवर आदळल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांना तातडीने आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.श्रेया रहिना यांनी त्यांना मृत घोषीत केले. तपास जमादार पाटील करीत आहेत.