नाशिक : शिवाजी चौकात आर्थिक देवाण घेवाणीतून सिडकोतील अल्पवयीन मुलावर दोघांनी धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीसांनी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने तक्रार दाखल केली आहे. हा अल्पवयीन मुलगा सोमवारी सायंकाळी शिवाजी चौकातील भाजी मार्केट भागात गेला होता. मार्केट मधील सायबर कॅफे येथे तो थांबला असता दोघा संशयितांनी त्यास गाठले. यावेळी पैसे दिले नाही या कारणातून दोघांनी या मुलास शिवीगाळ करीत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेत मुलाच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाली असून, तपास हवालदार परदेशी करीत आहेत.