नाशिक – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या वृद्धास पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलीच्या आईने या घटनेची तक्रार दिली असून अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी ही घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी सुकदेव तुकाराम पवार (वय ६२, रा. शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौक, नाशिक) हा तेथे आला. त्या वृद्धाने या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखविले आणि तिच्या गुप्तांगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर या मुलीने तिच्या आईला ही माहिती दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.