नाशिक – नातेवाईकानेच मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणा-याला अटक करण्यात आली आहे. काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीने मतिमंद मुलीस शिवाजीनगर येथील साईबाबा गार्डनमध्ये नेले. येथे संधी साधून आरोपीने मुलीला बाकावर बसविले व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.