नाशिक – हुक्का पार्लर चालवणा-या हॉटेल स्टड फॉर्म वर नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदशी शिवारात छापा छापा टाकून कारवाई केली आहे. या छाप्यानंतर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फहीम अहमद, चिराग रूगवानी, गणेश अंबादास, रमेश धात्रक या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गणेश वराडे यांनी या बेकायदेशीर पार्लरविरुध्द तक्रार दिली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाला आनंदवली चांदशी रोडवर असलेल्या स्टड फार्म या हॉटेलमध्ये हुक्का पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव या करीत आहे.