नाशिक – सराईत वाहनचोराला ठक्कर बझार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चोराला ताब्यात घेतल्यानंतर चार गुन्हयाचा उलगडा झाला आहे. या चोरांकडून पोलिसांनी सात स्प्लेंडर मोटारसायकली, दोन अॅक्टिव्हा मोपेड अशा ४ लाख ५५ हजार रुपये किमतीची दहा दुचाकी वाहने जप्त केल्या. भागवत संजय सानप (वय २७, रा. गंगापूर गाव) असे या वाहनचोराचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट-१ ला मिळालेल्या माहिती नंतर या सराईत चोराला गजाआड करण्यात आले आहे. पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना ठक्कर बझार येथे मोटारसायकल पार्किंगच्या परिसरात एक इसम संशयितरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. यानंतर ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनेश खैरनार, अंमलदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड व प्रवीण वाघमारे यांच्या पथकाने ठक्कर बझार येथील पार्किंगच्या परिसरात सापळा रचला. त्यात हा चोर अडकला. या चोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, पोलीस अंमलदार काळू बेंडकुळे, वसंत पांडव, येवाजी महाले, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नीलेश पवार, चंद्रकांत म्हसदे, आसिफ तांबोळी, महेश साळुंके, संदीप भांड, कविश्वर खराटे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख, गणेश वडजे, गौरव खांडरे, किरण शिरसाठ, अण्णासाहेब गुंजाळ, समाधान पवार या पथकाने ही कामगिरी केली.