नाशिक – मोबाईलमधून आइस्क्रिमचे पैसे दुकानदाराला देण्याची बळजबरी
नाशिक – चार पाच जणांनी एकाला अडवून त्याच्या मोबाईलमधून आइस्क्रिमचे पैसे दुकानदाराला देण्याची बळजबरी करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना. दहीपूलावर चांदवडकर लेन भागात घडली. या दादागिरीत लोखंडी सळाईचा वापर करुन एकाचे डोकेही फोडले. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय महेश सानप (वय २७, जानकी अपार्टमेंट घारपुरे घाट) याच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनू झगडे असे संशयिताचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री अकरा च्या सुमारास चांदवडकर लेन भागात अक्षय सानप जात असतांना तेथे आइस्क्रिम खात असलेल्या संशयितांनी त्याला अडवले. त्याच्या मोबाईलमधून आइस्क्रिमचे पाचशे रुपये सेंड केले याविषयी जाब विचारल्याने सोनु सह चार पाच मित्रांना त्याला बेदम मारहाण केली. लोखंडी सळईने डोके फोडले.
चोरट्यांनी घरफोडीत दागिणे केले लंपास
नाशिक – अंबड लिंक रोडवर जाधव संकूल भागात चोरट्यांनी घरफोडीत दागिणे लंपास केल्याची घटना घडली. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश दिंगबर गायकवाड जाधव संकूल यांच्या घराच्या शनिवारी (दि२६) बेडरुमच्या लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा तोडून घरात १५ ग्रॅमची सोन्याची पोत, ७ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल तोडून सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला.