नाशिक – बनावट सह्या करुन टॅकंर व ट्रॅक्टर विकून सुमारे ७७ लाखाला गंडा; चौघांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक – बनावट सह्या करुन टॅकंर व ट्रॅक्टर विकून सुमारे ७७ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या फसवणूक प्रकरणी चौघांवर उपनगर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. सिमा राजेश बोराडे (गंगापूर नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, चौघा संशयितांनी १९ आॅगस्ट २० ते २७ जुलै २१ दरम्यान एचपीसीएल पेट्रोलं पंपावर बोराडे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन टॅकर ट्रॅक्टर विकून ७७ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दिगंबर मधुकर बोराडे (वय ४४), मधुकर मुरलीधर बोराडे (वय ७६,) (पंचक जेल रोड), रोशन दिलीप जाधव (वय ३५.कळवण रोड दिंडोरी), विजय तुकाराम नेरे (वय ४५, धुळे) असे संशयितांची नावे आहेत.
टंगस्टन कार्बाईड रिंग्ज चोरीला
नाशिक – महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाच्या अंबड येथील इंडो पंप कंपनीच्या छताचे पत्रे वाकवून कंपनीत प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. नानासाहेब दादा ठाकरे राजीवनगर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी गुरुवारी रात्रीतून केव्हातरी इंडो पंप कंपनीच्या छताचे पत्रे उचकटूनकंपनीत प्रवेश करीत टंगस्टन कार्बाईड रिंग्ज चोरुन नेले.