नाशिक – पोलिसांची परवाणगी न घेता आंदोलन करणे पडले महागात; १२ पदाधिका-या विरोधात गुन्हा दाखल
नाशिक, – पोलिसांची परवाणगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शनिवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यात निदर्शने करीत आमदार बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पोलिसांची परवानगी न घेता केलेल्या आंदोलनावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पवन पवार, संजय साबळे, निरंजन शिंदे, वामनदादा गायकवाड, उर्मिला गायकवाड यांच्यासह इतर १२ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हद्दपार केलेल्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक – शहर पोलिसांनी डिसेंबर महिन्यात एक वर्षासाठी शहर जिल्ह्यातून हद्दपार केलेला रोहीत ज्ञानेश्वर सोळसे (वय २२, भिमवाडी) याच्या घासबाजारात मुसक्या आवळल्या. शुक्रवारी (दि.२५) हद्दपार केलेला सराईत भिमवाडीत असल्याची माहीती मिळाल्यावर गुन्हे शाखा युनीटच्या पोलिसांनी भद्रकाली त त्याच्या घरी छापा टाकला असता, तो मिळून आला. याप्रकरणी कविश्वर निवृत्ती खराटे यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.