नाशिक : मोटारसायकल चोरणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. रितेश भाऊसाहेब चव्हाण (२२ रा.पेठरोड) व हर्षल सुनिल वनवे (१९ रा.तारांगण सोसा.राऊ हॉटेल जवळ) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. या चोरांकडून पोलीसांनी तीन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास चोरीची केटीएम दुचाकी घेवून राजरोसपणे फिरणारा रितेश चव्हाण हा चोरटा पोलीसांच्या हाती लागला. पोलीस तपासात हर्षल वनवे याचे नाव समोर आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने दुचाकी चोरीच्या गुह्यांची कबुली देत चोरीची केटीएम आणि सिडी डॉन मोटारसायकल काढून दिल्या. संशयितांच्या ताब्यातून तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदीर पाटील,जमादार संजय पवार,हवालदार बाळासाहेब मुर्तडक,पोलीस नाईक देवराम चव्हाण,सतिष वसावे,शिपाई प्रशांत देवरे,जितेंद्र शिंदे,विनायक तांदळे व विशाल गायकवाड आदींच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.