नाशिक : सिडकोतील उपेंद्रनगर भागात घरासमोर लावलेली सायकल चोरी केल्याप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे संशयितास बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातून सायकल हस्तगत केली आहे. दयानंद सुदाम साळवे (१९ रा.फे्रशअप बेकरीसमोर,मॉन्टेक्स कंपनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पराग विजय कांबळे (रा.प्रसन्न नगर,माणिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कांबळे यांची बिटविन कंपनीची सायकल १ मार्च रोजी त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.