नाशिक : बिटको पॉईंट येथील रेमंड शोरूम भागात भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी पादचारी ठार झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ५५ वर्षीय अनोळखी पुरूष शुक्रवारी दुपारच्या सुमारास बिटको पॉईंट येथील रेमंड शोरूम समोरून पायी जात असतांना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखणी झाल्याने १०८ अॅब्युलन्स चालक पंकज जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून अधिक तपास पोलीस नाईक कु-हाडे करीत आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.