नाशिक – दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी भररस्त्यात दुचाकीस्वाराला अडवून त्याच्या अंगठ्यासह ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. पंचवटीत कळसकर बंगल्यासमोर गुरुवारी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पुष्पराज रमेश भोसले (वय ३९, सुविश्वास रो हाउस,सिध्दी विनायक टाउनशिपत्रिकोणी बंगला पंचवटी) हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी रस्त्यात त्यांची दुचाकी अडविली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेत त्यांच्या पॅन्टच्या खिशात हातात घालून रोख रकमेसह अडीच तोळ्याची सोन्याची चेन काढून घेतली.









